Flour Mill Yojana 2025 नमस्कार मंडळी! महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने एक उपयुक्त योजना सुरू केली आहे – मोफत पिठाची गिरणी योजना 2025. आज आपण या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत – पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा आणि या योजनेचा लाभ कसा मिळवायचा?
योजना काय आहे?
पिठाची गिरणी योजना 2025 ही महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत राबवली जाते. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाची गिरणी आणि काही प्रकरणांमध्ये पिको व फॉल मशीन देखील दिली जाते.Flour Mill Yojana 2025
कोणते जिल्हे या योजनेत समाविष्ट आहेत?
- पुणे
- सातारा
- बुलढाणा
अनुदानाचे स्वरूप:
- लाभार्थींना ९०% अनुदान दिले जाते.
- Direct Benefit Transfer (DBT) प्रणालीद्वारे अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाते.
पात्रता आणि अटी – Flour Mill Yojana 2025
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी योजना आहे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 च्या आत असावे.
- अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
- अर्जदाराचे कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय / निमशासकीय नोकरीत नसावा.
- अर्जदाराचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे.
- अर्ज करताना मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, पॅन कार्ड जोडणे बंधनकारक आहे.
- वयाची अट – १७ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.
- अपंग लाभार्थींनी अपंग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्रांची यादी – Flour Mill Yojana Documents 2025
अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:
- वयाचा पुरावा (उदा. जन्मतारीख दाखला / शाळेचा दाखला)
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदाराकडून)
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुकची झेरॉक्स (खाते क्रमांक व IFSC कोडसह)
- अपंग, विधवा, शेतकरी आत्महत्याग्रस्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- विजेचे बिल
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज कसा करायचा? (Offline Application Process)
या योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज डाउनलोड करून भरावा लागतो. खालील जिल्ह्यांनुसार अर्ज डाउनलोड करा:
जिल्हा | अर्ज डाउनलोड लिंक |
---|---|
पुणे | [PDF डाउनलोड करा] |
सातारा | [PDF डाउनलोड करा] |
बुलढाणा | [PDF डाउनलोड करा] |
अर्ज प्रक्रिया:
- संबंधित जिल्ह्याचा अर्ज डाउनलोड करा.
- सर्व माहिती भरून घ्या आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज जिल्हा परिषद कार्यालयात जमा करा.
- अर्जाची छाननी झाल्यानंतर लाभ मंजूर झाल्यास तुम्हाला मेसेजद्वारे कळवले जाईल.
- पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाईल.
निष्कर्ष
ही योजना महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधा.Flour Mill Yojana 2025
ही माहिती उपयुक्त वाटली का?
कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शासकीय योजना व अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!
मुलींना मोफत शिक्षण मिळतं ते कुठे उल्लेख करावा आता फिजिओथेरपी साठी सरकार चे कोणतेही कॉलेज जे मुलींना मोफत शिक्षण देते ते सांगावे