Video: “मला हात लावू नकोस!” – विशालच्या कृतीवर राखीचा संताप; ‘Bigg Boss Marathi 6’मध्ये रंगला मोठा वाद

Video: Bigg Boss Marathi ’च्या सहाव्या पर्वात सुरुवातीपासूनच स्पर्धकांमध्ये टास्कदरम्यान जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही घरात मैत्री, भांडणं, गैरसमज आणि भावनिक क्षण यांचा संगम प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मात्र https://wegwanmaharashtra.in/नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोने सोशल मीडियावर मोठी चर्चा पेटवली आहे.

गणिताच्या तासात रंगला वादया आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात शाळेचा टास्क देण्यात आला आहे. घरातील सदस्य विद्यार्थी बनून वेगवेगळ्या तासांमध्ये भाग घेत आहेत.

गणिताचा तास सुरू असताना एक चेंडू हिसकावण्याचा टास्क दिला जातो. यामध्ये तन्वी राखीला रुचिताकडून चेंडू घेण्यास सांगते.

राखी चेंडू घेण्यासाठी पुढे सरसावते, पण त्याच वेळी मागून विशाल येतो आणि कोणतीही पूर्वसूचना न देता तिला उचलून दुसऱ्या बाजूला नेतो.

प्रोमोमध्ये स्पष्ट दिसते की, विशालच्या या कृतीची राखीला कल्पनाही नव्हती. अचानक उचलल्यामुळे ती संतापते आणि लगेच त्याला स्पष्ट शब्दांत सुनावते –“विशाल, ही तुला शेवटची वॉर्निंग आहे… यापुढे मला हात लावू नकोस!”

सोशल मीडियावर संतापाची लाट

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. अनेकांनी राखीची बाजू घेत विशालच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली.
“असं कोण उचलतं?”, “ओव्हरअॅक्टिंग चालली आहे”, “बेशिस्त विद्यार्थी!”, “टास्कचा बट्ट्याबोळ केला” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. काहींनी तर राखीने दिलेली वॉर्निंग योग्यच असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं.

धक्क्यावर’ काय होणार?

आता प्रेक्षकांच्या नजरा आहेत त्या ‘रितेश भाऊच्या धक्क्या’कडे. या प्रकरणावर होस्ट विशालला काय सुनावणार? त्याने घरात राखीची माफी मागितली का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी भागात मिळणार आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे घरातील समीकरणं बदलणार का, की हा वाद इथंच थांबणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये पुढे आणखी कोणते ट्विस्ट येतात, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Comment